माऊली शिक्षण प्रसारक मंडळ

जामघर, पोस्ट - नेहरोली, तालुका - वाडा

रजि. नं. १५ मार्च महा. / १९० / २००० एफ - ८५७८ / ठाणे

आमच्याविषयी

आपली माऊली शिक्षण प्रसारक मंडळ ही सेवाभावी संस्था वाडा,जव्हार,विक्रमगड,मोखाडा या अतिशय दुर्गम व डोंगराळ विभाग दऱ्याखोऱ्यातील व डोंगर माथ्यावरील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे व ते स्वावलंबी व्हावेत म्हणून कृतिशील आहे. वाडा,जव्हार,विक्रमगड,मोखाडा म्हटले कि आपण नेहमीच कुपोषण भूकबळी, मातामृत्यू, बालमृत्यू, असे वृत्तपत्रात वाचत असतो. या समस्या समूळ नष्ट करण्यासाठी शिक्षणच महत्वाचे आहे. म्हणून आदिवासी मुलांसाठी आम्ही आदिवासी हायस्कूल वाळवंडा हि माध्यमिक शाळा सुरु केली आहे. ह्या शाळेत ३०० आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्याना मोफत शिक्षण असून वह्या, पुस्तके, गणवेश, गाईड, कंपास, प्रयोगवह्या अशा शैक्षणिक साहित्याची शाळेस गरज असते.

तसेच आमच्या शाळेतील ५० मुला / मुलींसाठी वसतिगृहाची सोय केली आहे. तसेच शाळेतील कुठल्याही विद्यार्थ्याकडे दुपारचा जेवणाचा डबा नसतो यासाठी जेवणाची सुविधा केली आहे. यासाठी अन्नधान्य व आर्थिक सहकार्याची गरज आहे. तसेच अचानक ओढवलेल्या वैदकीय समस्ये मुले कुटुंब आर्थिक व मानसिक दृष्ट्या खचून जाऊ नये अशा कुंबीयांना वैदकीय मदत मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असतो. या देशसेवेत आपणही आमच्या सोबत असाल अशी आमची इच्छा आहे . आम्हास या सामाजिक कार्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या दानशुर व्यक्ती व संस्था ह्याचे आम्ही मनापासून ऋणी आहोत.

शाळेच्या दत्तक पालक योजना -

  • वसतिगृह विद्यार्थी खर्च ( प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी ) - १२०००/-
  • मध्यान्न भोजन खर्च ( प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी ) - ५०००/-
  • युनिफॉर्म 2( प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी ) - १५००/-
  • शैक्षणिक साहित्य ( प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी ) - २०००/-
  • सहलीसाठी ( प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी ) - २०००/-
  • गुरुदक्षिणा योजना ( विनावेतन शिक्षकांसाठी ) मासिक - ८००० /-
  • परिचारिका द. पा. यो. (१.५ वर्ष कोर्स ) (प्रति विद्यार्थीनी) - २५०००/
  • दुर्गम भागातील शाळा / अंगणवाडी दुरुस्तीसाठी सहकार्य करावे

आमचे प्रेरणास्थान

मा. श्री. श्रीकांतजी देवळे साहेब

९८२००९९६००

अध्यक्ष

श्री. विलास गोळे

९०४९६७२४८१

सचिव

डॉ. श्री. रवींद्र घागस

७७४३९९५५१५

कार्याध्यक्ष

श्री. कमलाकर पाटील

९४२३९४७३९९

कोषाध्यक्ष

सौ. वृषाली गोळे

९९२१२४२४५९

सहसचिव

श्री. एल. बी . शेलार

८३२९२८०११३

धनादेश व ऑनलाईन देणगी स्वरूपात मदत करण्यासाठी बँकेचा तपशील

1. बचत खाते क्र. 520101025740497
बँकेचे नाव व शाखा Union Bank, Wada, Dist. Palghar 421303
IFSC Code UBIN0931829
2. बचत खाते क्र. 598002010000403
बँकेचे नाव व शाखा Union Bank of India, Wada, Dist. Palghar
IFSC Code UBIN0931829
3. बचत खाते क्र. 62353650194
बँकेचे नाव व शाखा State Bank Of India, At Post-Wada, Taluka-Wada, Dist. Palghar
IFSC Code SBIN0001125

© All copyrights reserved Mauli Shikshan Prasarak Mandal. Design by SmarTech SoluTions.